Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोरासह मोटरसायकल यावल पोलीसांच्या ताब्यात

 

यावल ( प्रतिनिधी ) येथील शहरातुन सार्वजनिक ठिकाणाहुन चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा तपास लावण्यात पोलिसांना यश मिळाले असुन, मोटरसायकलसह संशयीत आरोपीला अटक करण्यात आली आहे .

या संदर्भात मिळालेली माहीती अशी यावल शहरातील भुसावळ मागीवर असलेल्या आई हॉस्पीटल समोर सार्वजानिक ठिकाणी दिनांक ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास साकळी तालुका यावल येथील राहणारे शेख आसिफ शेख सल्लाउद्दीन यांची बजाज डिस्कव्हरी कंपनीची एमएच १९ ए यु८६०९या क्रमांकाची सुमारे पंच्चविस हजार रुपये किमतीचे वाहन कुणीतरी अज्ञात व्याक्तिने संमती विना चोरुन नेल्याची फिर्याद दाखल केली होती.
दरम्यान यावल पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी नितिन चव्हाण, पोलीस कर्मचारी संजय देवरे यांनी तपासाची यंत्रणा फिरवुन अवघ्या २४तासाच्या आत मोटरसायकल चोरी प्रकरणातील आरोपी किरण रमेश मराठे ( रा साकळी तालुका यावल) यास चोरीस गेलेल्या मोटरसायकलसह त्याच्या साकळी येथील राहत्या घरातुन अटक केली आहे. या बाबत यावल पोलीसात भाग ५ भादवी ३७९प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Exit mobile version