Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गावठी हातभट्टीवर पोलीसांची कारवाई; ४७ हजारांचा मुद्देमाल नष्ट

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध हातभट्टीची दारू तसेच दारूसाठी लागणारे कच्चे व पक्के रसायन पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या पथकाने कारवाई करत ४७ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. याबाबत दारू पाडणारे दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अवैध हातभट्टीची दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

रावेर तालुक्यातील थेरोळा शिवारात तापी नदीच्या काठी भिमराव बंन्सी अटकाळे व सुपडु गंभीर अटकाळे दोन्ही रा.थेरोळा तापी नदी काठी सार्वजनीक जागी हातभट्टीची तयार दारु गाळण्याची भट्टी रचुन दारु गाळीत असताना पोलीस छापा टाकला. त्यावेळी त्यांनी पोलीसांना पाहून पळ काढला. यावेळी पोलीस टीमने प्लास्टीक कॅनमध्ये भरलेली दारू तसेच गुळ, महू मिश्रीत उकळते पक्के रसायन, पत्री ड्रम असे शेकडो लिटर हातभट्टी दारूसाठी लागणारे रसायनसहीत ४७ हजार ५०० रुपयांचे मुद्देमाल पोलिस निरीक्षक डॉ विशाल जैस्वाल यांच्या टीमने नष्ट केला आहे.

याप्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला तीन इसमांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वरील कारवाई सहा.पोलीस अधिक्षक अन्नपूर्णा सिंग, पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल रावेर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि घनश्याम तांबे, पोहेकॉ अर्जुन सोनवणे, पोकॉराहुल परदेशी, चैतन्य नारखेडे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

Exit mobile version