Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतात फवारणी करतांना विषबाधा; तरूणाचा दुदैवी मृत्यू

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतात पिकांवर औषधाची फवारणी करत असतांना विषबाधा झाल्याने तरूणाचा उपचारादरम्यान दुदैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वरखेडी शिवारात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील रहिवाशी अविनाश अशोक भोई (वय – २८) हा तरूणाची वरखेडी शिवारात १ एकर शेत जमिन आहे. अविनाश भोई हे रविवारी ३० जुलै रोजी आपल्या शेतात लावलेल्या पिकावर फवारणी करत असतांना विषारी औषधाने त्यांना भुरळ येवुन ते बेशुद्ध झाले होते. ग्रामस्थांच्या मदतीने अविनाश भोई यांना तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान मृत्यूशी झुंज देत असतांनाच सोमवारी १ ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

अविनाश हा त्यांच्या कुटुंबियातील कर्ता युवक असल्याने त्याचे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत अविनाश भोई यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडिल, तीन बहिणी असा परिवार असुन अविनाश च्या अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

 

Exit mobile version