Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विष घेतलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विषारी औषध घेतलेल्या जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथील २३ वर्षीय तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अखेर सोमवारी २ ऑक्टोबर रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चुडामण रमेश नारखेडे (३९, रा. भादली बुद्रुक) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

चुडामण रमेश नारखेडे हा तरूण जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथे आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. त्यांनी गावातील गुरांच्या गोठ्यात पिकांवर फवारणी करण्याचे विषारी औषध सेवन केल्याची घटना २१ सप्टेंबर रोजी घडली होती. त्याला जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतांना २८ सप्टेंबर रेाजी मध्यरात्री २ वाजून १५ मिनीटांनी मृत्यू झाला होता. याबबात अखेर सोमवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव करीत आहे.

Exit mobile version