Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिन पूर्वसंध्येला कवि संमेलन संपन्न

जळगाव प्रतिनिधी | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला भिमरमाई प्रतिष्ठान, सत्यशोधकी साहित्य परिषद, डॉ. ए. पी जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी यांच्या विद्यमाने ॲड. बाहेती महाविद्यालयात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रा. डॉ.के. के. अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. विचार मंचावर प्राचार्य डॉ. अनिल लोहार, डॉ. मिलिंद बागुल, मुकुंदभाऊ सपकाळे हे उपस्थित होते.

” हे महामानवा,
तुझी करुणा येऊ दे आजच्या जना मनात
प्रकाश पसरू दे दाही दिशात…”

अशा सुंदर अभिव्यक्ती असलेल्या कविता सदर करण्यात आल्या.
प्रथमतः प्रकाश पाटील ‘नेत्यांची दिवाळी’ ही कविता सादर केली, क्रांतीसुर्य प्रा. डॉ. प्रदीप सुरवाडकर, बाबासाहेबांचे लेकरू बना मंगल बी. पाटील, काय केलं अरुण कुमार जोशी, भिमाचे स्मरण एस. पी. झलटे, हे बोधिसत्वा शिवराम शिरसाट, रसिक शिरीष चौधरी, लेखणी किशोर नेवे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर अरुण वांद्रे, समाजाचा गाडा पुढे न्या दिलीप सपकाळे, आदी.कवितांनी कविसंमेलनाला रंगत आणली

याप्रसंगी इंदिरा जाधव, प्रमोद इंगळे, गोविंद देवरे, रमजान तडवी,विनोद अहिरे,अशोक पारधे,अरुण वांद्रे,अरुणकुमार जोशी,दिलीप सपकाळे,गोविंद पाटील, भैय्यासाहेब देवरे इत्यादींनी आपल्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सुनील सोनवणे यांनी केले. कार्यक्रमास प्रा डॉ. गौतम भालेराव, प्रा. राहुल बनसोड, ईश्वर मोरे, अनिल सुरडकर विजय गवले, सुनील अहिरराव, खेमराज खडके, सादिक शेख आदी. मान्यवर उपस्थित होते .

Exit mobile version