Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथील पो. नि. अरुण धनवडे यांनी स्विकारला पदभार

यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणूवर मात करत यावल पोलीस स्टेशनचे कोरोना योद्धा पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी आज आपल्या पदाची सुत्रे स्विकारली आहेत.

गेल्या काही दिवसांपासुन सुरू असलेल्या चर्चेस आता पुर्णविराम मिळाला आहे. यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक म्हणुन साधारण आठ महिन्यापुर्वी रूजु झालेले कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांनी कार्य तत्परतेने आणि जनसंपर्काच्या माध्यमातून आपली एक वेगळीच ओळख निर्माण करून अल्पवधीत त्यांनी अनेक गुन्ह्यांचा तपास लावण्यात यश मिळवले. दरम्यान याच काळात मार्च महिन्यात संपुर्ण देशात आणि राज्यात आलेल्या कोरोना विषाणु संसर्गाच्या संकट काळात लॉकडाउनचे अतिशय काटेकोर नियमांची अमंलबजावणी करीत अनेकांचे विरोध स्विकारून आपले जिव धोक्यात घालुन अहोरात्र परिश्रम घेवुन नागरीकांमध्ये कायद्याची शिस्त राखण्याचा मार्ग दिला.

कोरोना संकटाच्या काळात आपले कर्तव्य बजावतांना त्यांना कोरोनाची लागण झाली. यात देखील कोरोनाशी एक महीना संघर्ष करून अखेर त्यांनी कोरोनावर मात करून आज त्यांनी आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्याकडुन यावल पोलीस स्टेशनचे पदभार स्विकारला. पदभार स्विकारल्यावर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

Exit mobile version