Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पीएमसी बँक घोटाळा : एचडीआयएलच्या संचालकांना अटक; ३५०० कोटींंची मालमत्ताही गोठवली

 

pmc bank

 

मुंबई (वृत्तसंस्था) पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतील (पीएमसी) घोटाळाप्रकरणी गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेने हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे (एचडीआयएल) संचालक सारंग वाधवा आणि राकेश वाधवा यांना अटक करण्यात आली आहे. तसेच ३५०० कोटी रुपयांची मालमत्ताही गोठवली आहे.

काही दिवसांपूर्वीच पीएमसी बँकेकडून थकित कर्जाबद्दलची खोटी माहिती रिझर्व्ह बँकेला देण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. विशेष म्हणजे बँकेने दिलेल्या एकूण कर्जापैकी ७५ टक्के कर्ज हे एकट्या एचडीआयएल कंपनीलाच देण्यात आले होते. हा गैरव्यवहार समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लादण्यात आले होते. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक गुन्हे शाखेकडून सारंग वाधवा आणि राकेश वाधवा या दोघांची चौकशी सुरु होती. मात्र, चौकशीत सहकार्य करत नसल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने आज या दोघांना अटक केली. तसेच या दोघांची ३५०० कोटी रुपयांची मालमत्ताही गोठवली आहे.

Exit mobile version