Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पीएमसी बँक घोटाळा : खातेधारक महिलेचा हार्ट अटॅकने मृत्यू

pmc bank

 

मुंबई (वृत्तसंस्था) नवी मुंबईतील खारघर येथे राहणाऱ्या विग कुटुंबीयांमधील 64 वर्षीय कुलदीप कोर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. आपल्या पैशांचे काय होणार,? या धास्तीने आतापर्यंत सात खातेदारांवर मृत्यू ओढवला आहे.

 

वीरेंद्र विग हे खारघर मध्ये भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा सून, तसेच त्याची विधवा मुलगी आपल्या दोन मुलांसोबत राहत आहे. या मुलीसाठी त्यांनी 15 लाखांच्या ठेवी खारघरमधील पीएमसी बँकेच्या शाखेत ठेवल्या होत्या. पण बँकेवर निर्बंध आल्याने पैसे आणि ठेवी बुडणार, अशी भीती वरींदर विग यांची पत्नी कुलदीप कोर यांना होती. रात्री 11 वाजता झोपायला गेल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे वीरेंद्र विग यांनी सांगितले.

Exit mobile version