Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पीएमसी बँक प्रकरण : ३० ऑक्टोबरला पत्रकार परिषद

pmc bank

मुंबई प्रतिनिधी । कर्ज थकीत घोटाळ्यामुळे आर्थिक निर्बंध आलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेसंबंधी रिझर्व्ह बँक (आरबीआय) ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय जाहिर केला आहे. आरबीआयने आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या पीएमसी खातेधारकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली.

पीएमसी खातेधारक गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. आज पीएमसी खातेदारकांची आरबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्पन्न झाली. यावेळी आरबीआयने सध्या आचारसंहिता लागू असल्याने निर्णय घेणं शक्य नसल्याचं सांगितलं असल्याची माहिती एका खातेधारकाने दिली आहे. तसंच आरबीआयने २५ आणि २७ ऑक्टोबरला पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल असं सांगितलं आहे. यावेळी आरबीआयने ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर करु असंही आश्वासन दिले. दरम्यान पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी अटकेत असणाऱ्या आरोपी राकेश वाधवन आणि सारंग वाधवन यांच्या कोठडीत २४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Exit mobile version