Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूरात ९ सप्टेंबर रोजी पीएम किसान समस्या निवारण शिबिर

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे दिनांक ९ सप्टेंबर रोजी सकाळी   पीएम किसान समस्या निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या शेतकरी बांधवांचे पीएम किसान चे अनुदान त्यांच्या खात्यावरती येत नसल्यामुळे गेल्या वर्षभरापासून शेतकरी तहसील ऑफिस येथे फेर्‍या माराव्या लागत होत्या. मात्र आता या विषयाला पूर्णविराम मिळणार असून गेल्या मागील महिन्यात ज्या २२२ शेतकरी बांधवांनी सेतू सुविधा केंद्र वरती आपापली संबंधित कागदपत्रे जमा केलेली आहे अशा शेतकर्‍यांना आवाहन करण्यात येते की दिनांक ९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता शुभ दिव्य लॉन व मंगल कार्यालय (बस स्टँड समोर)येथे पीएम किसान समस्या निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्या २२२ शेतकर्‍यांनी आपापले कागदपत्रे जमा केलेली आहे अशा शेतकरी बांधवांना या शिबिराच्या ठिकाणी सकाळी ९.०० वाजेपासून टोकन क्रमांक देऊन ज्या समस्या आहे त्या तात्काळ या ठिकाणी सोडविल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

या शिबिरासाठी संपूर्ण महसूल विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी व फैजपूर शहरातील सर्व बँकांचे प्रतिनिधी असा संपूर्ण स्टॉप या ठिकाणी उपलब्ध राहणार असून तात्काळ या ठिकाणी समस्या निवारण करण्याचा प्रयत्न   तहसीलदार मोहनमाला नाझीरकर करणार आहेत.

त्यांच्यासोबत निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, तालुका कृषी अधिकारी, फैजपूर मंडळाधिकारी व तलाठी यांच्यासह सर्व अधिकारी वर्ग या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे. यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी आपापली कागदपत्रे सुविधा केंद्र वरती जमा केलेली आहे अशा शेतकरी बांधवांनी या ठिकाणी स्वतः उपस्थित राहण्याचे आवाहन फैजपूर येथील सामाजिक कार्यकर्ते व अंबिका दूध उत्पादक सोसायटी संचालक  पप्पू चौधरी यांनी केलेले आहे.

Exit mobile version