Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल महाविद्यालयात स्वच्छ व सुंदर वसुंधरा निर्मितीसाठी प्रतिज्ञावाचन

यावल प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाव्दारे संचलित, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आज (दि.९ फेब्रुवारी) रोजी यावल नगर परिषदेच्या व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने “माझी वसुंधरा” या अभियानाअंतर्गत महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी यांनी महाविद्यालयात स्वच्छ व सुंदर वसुंधरा निर्मिती साठी प्रतिज्ञावाचन कार्यक्रमाचे आयोजीत करण्यात आले होते.

यात महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. ए. पी. पाटील, प्रा. मनोज पाटील, प्रा. एस. आर. गायकवाड, प्रा. डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा. डॉ. सुधा खराटे , मिलिंद बोरघडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच नगरपरिषदेच्या वतीने  योगेश बोरसे,  चांगरे,  शाहरुख खाटीक तसेच नगरपालिकेचे इतर कर्मचारी हे या कार्यक्रमाला प्रामुख्याने हजर होते. वेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यांनी देखील या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला.

Exit mobile version