Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आईस्क्रीम पार्लरमध्ये ग्राहकांच्या जीवाशी खेळ; कुल्फीमध्ये निघाले झुरळ

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जळगाव रोड सोनबर्डीच्या पायथ्याशी असलेल्या व्यापारी संकुलामधील ‘महावीर आइस्क्रीम पार्लर’ या दुकानावर ग्राहकाच्या कुल्फीमध्ये चक्क झुरळ निघाल्याची घटना घडली असून या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, “जामनेर शहरातील जळगाव रोड वरील महावितरण सबस्टेशन शेजारी असलेल्या व्यापारी संकुलांमध्ये महावीर आइस्क्रीम पार्लर हे दुकान असून गुरुवार रोजी नऊ वाजेच्या सुमारास अभिषेक राजनकर व त्यांचे मित्र कुल्फी खाण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी कुल्फी विकत घेतली. खाण्यापूर्वी कुल्फीला व्यवस्थित पाहत असताना महावीर आईस्क्रीम पार्लरच्या कुल्फीमध्ये झुरळ निघाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. यावेळी अभिषेक राजूरकर यांनी महावीर आईस्क्रीम पार्लरचे संचालक यांना जाब विचारला असता त्यांनी ‘भैय्या, गलती हो गयी’ असे सांगत माफी मागितली आणि झुरळ असलेली कुल्फी फेकून दिली.”

महावीर आईस्क्रीम पार्लरचे संचालक यांनी ग्राहकांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलिसात तक्रार देणार असल्याची माहिती अभिषेक राजनकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली असून कुल्फी निघालेल्या पार्लरवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी केली आहे.

त्याचबरोबर अशाप्रकारे अनेक वेळा शहरात असलेल्या महावीर आईस्क्रीम पार्लरच्या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या हात गाड्यावर अशाप्रकारे कुल्फीमध्ये झुरळ निघाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत असून अन्न व भेसळ प्रशासनाने जामनेर शहरातील सर्व हात गाड्यावर थंड पेय विकणाऱ्या दुकानाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Exit mobile version