Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिंदू – मुस्लीम एकतेचा संदेश देत पोलीस मुख्यालय आवारात वृक्षारोपण

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  भारत देश सर्व धर्मसमभाव व एकतेचा संदेश देणारा देश आहे. नुकतेच आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी साजरे करण्यात आले. शांततेत पार पडलेल्या या उत्सवातून एकतेचा संदेश देत पोलीस मुख्यालय आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

रविवारपासून जिल्ह्यात देखील पावसाची संततधार सुरू असल्याने समाधान पसरले आहे. जळगाव पोलीस मुख्यालय आवारात सामाजिक कार्यकर्त्या दिपाली कासार यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक उपक्रम राबविणार्‍या एका गटाकडून नारळाचे रोप लावत वृक्षारोपण करण्यात आले.

आषाढी एकादशी आणि बकरी ईद राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले. नारळ हे हिंदू धर्मात पवित्र मानले जाते तर नारळाच्या खोबऱ्याचा किस वापरल्याशिवाय शीरखुर्मा तयारच होऊ शकत नाही. नारळाचे पाणी ज्याप्रमाणे निर्मळ आणि स्वच्छ असते तसेच निर्मळ मन ठेवत दोन्ही समाजांनी एकोपा ठेवावा यासाठी पोलीस मुख्यालय आवरत नारळाचे झाड लावून एकतेचा संदेश देण्यात आला.

पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रसंगी आरपीआय श्री.सोनवणे, समाजसेविका दिपाली कासार, आनंद शिरापुरे, कस्तुरी शिरापुरे, आदित्य शिरापुरे, पवित्रा वाणी, हेतल वाणी, अमिता बागुल, शरीफा बेन, नसरीन बी, गणेश पाटील, साहिल पठाण आदींसह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पावसाची संततधार सुरू असताना देखील पोलीस अधिक्षकांनी वेळ काढत सामाजिक सलोखा जपण्यास प्रोत्साहन दिले.

Exit mobile version