Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पर्यावरण दिनानिमित्त भुसावळात १०१ झाडांची लागवड

भुसावळ प्रतिनिधी । आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील दीपनगर येथील बी.एच.ई.एल व ओ३ गणेशा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १०१ झाडांची लागवड करण्यात आली. तसेच यावेळी पर्यावरण रक्षणाची शपथ देखील घेण्यात आली.

येथील बी.एच.ई.एल  मार्फत 660 मेगाव्हॅट औष्णीक विद्युत प्रकल्पाचे काम जोमाने सुरु आहे. त्या ठिकाणी मोकळे जागेवरून व रस्त्यांच्या दुतर्फा जागतिक पर्यावरणाच्या दिनाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली. 

याप्रसंगी पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली मुख्य अतिथी म्हणून प्रमुख उपस्थित विवेक रोकडे प्रमुख महा जॉनकडे प्रोजेक्टर संजय गोसावी प्रतिबंधक जावळे निर्माण प्रतिबंधक विश्वासराव बडगुजर उपाध्यक्ष गणेशा प्रतिष्ठान भुसावळ यांची उपस्थिती होती आशुतोष बच्छाव वनपरिक्षेत्र अधिकारी मुक्ताईनगर यांनी रोपांची उपलब्धता करून दिली कार्यक्रम यशस्वीतेसाठी समस्त साईड यांनी परिश्रम घेतले.

 

 

Exit mobile version