Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेंदुर्णी येथे दावते इस्लामी हिंद तर्फे वृक्षारोपण

शेंदुर्णी प्रतिनिधी । येथील मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये दावते इस्लामी हिंदच्या फैजाने ग्लोबल रिलीफ फाऊंडेशनतर्फे आज वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी दावते इस्लामी हिंद जिल्हाध्यक्ष जुबेर शेख आत्तारी यांनी इस्लाम धर्मातील वृक्ष लागवडीचे महत्व विशद करून नैसर्गिक आपत्तीत मानवाला  वाचविण्यासाठी वृक्ष लागवड सर्वोत्तम पर्याय त्यामुळे दावते इस्लामी हिंद मार्फत संपूर्ण देशात वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेत १कोटी २० लक्ष वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शेंदूर्णी नाचनखेडा जिल्हा परिषद सदस्या सौ.सरोजीनी गरुड, नगरसेविका वृषाली गुजर,पंडित दीनदयाळ पतसंस्था अध्यक्ष अमृत खलसे, माजी सरपंच सागरमल जैन, धीरज जैन, रवींद्र गुजर, माजी उपसरपंच खलील पठाण, मुख्याध्यापक अब्रार, फारूक खाटीक, फरीद टेलर, फरीद पठाण, सलीम शेख ,निसार शेख उपस्थित होते. 

या कार्यक्रमात माजी सरपंच सागरमल जैन, अमृत खलसे यांनी आपल्या भाषणात दावते इस्लामी हिंदच्या कार्याचे कौतुक करून त्यांना सामाजिक उपक्रमासाठी आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही दिली. या मोहिमेत शाळा, कब्रस्थान, मोकळे पटांगण व सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सैय्यद शादाब रजा यांनी तर सूत्रसंचालन शरीफ जनाब यांनी केले.

 

Exit mobile version