Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळा न्यायालयाच्या आवारात वृक्षारोपण

पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा न्यायालयाच्या आवारात जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 

तालुका विधी सेवा समिती, पोलीस स्टेशन,प्रादेशिक वन विभाग, नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी न्या. के.के. माने, न्या.एम.एस. काझी, वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. देसले, ज्येष्ठ विधीतज्ञ अनिल देशपांडे, ए. आर. बागुल, वकील संघाचे अध्यक्ष भूषण माने, अतुल मोरे, सतीश पाटील, तुषार पाटील, सतीश पाटील तरडी, सपोनि रविंद्र बागुल, नगरपालिकेच्या अधिकारी संघमित्रा संदांनशिव हे उपस्थित होते.

 

 

सदर कार्यक्रमात वनक्षेत्र अधिकारी एसबी देसले यांनी पर्यावरणाच्या समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्याचे संगोपन करणे आजची काळाची गरज असल्याचे सांगितले तर न्यायाधीश के के माने व एम एस काझी यांनी आम्ही सदर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लावलेल्या वृक्षांचे संगोपन  करण्याचे आश्वासन दिले यावेळी चोरवड वनपाल आर बी भदाने, मोंढाळे वनपाल ए.एम बोरुडे, तरवाडे वनरक्षक आय बी मोरे, मोंढाळे वनरक्षक श्रीमती आर आर सूर्यवंशी, म्हसवे वनरक्षक श्रीमती एसबी कुंभारे, चोरवड वनरक्षक श्रीमती एस यू खैरणार, दळवेल वनरक्षक श्रीमती एस.व्ही.पाटील, पी. बी. माळी, सहाय्यक अधिक्षक,बी. एम. भोसले सहाय्यक अधिक्षक, के. जी. कुमावत वरिष्ठ सहाय्यक, तालुका विधी सेवा समिती,पंकज महाजन कनिष्ठ सहाय्यक, तालुका विधी सेवा समिती,कनिष्ठ लिपिक व्ही. एस. मराठे, डी. एम. महाले, एम. एस. महाजन,

एच. एस. सोनवणे, एच. सी. संन्यासी, एस. एस. मराठे , एम. डी. बागड, जे. वाय. पिंजारी, टी. एस. पवार, जे. आर. खैरणार, कु. यु. एस. पुराणीक, हेड बेलीफ व्ही. आर बडगुजर, बेलीफ ए. पी. कुलकर्णी, आर. एल. चौधरी, जी टी मात्रे, के ए भोसले, शिपाई वाय पी शिंदे,आर आर भोई,डी पी देशपांडे, सी एस गावंडे यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version