Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात स्वामी समर्थ केंद्रातर्फे वृक्षारोपण

29edc25c 4cb9 4019 a0fe daedaa2a0bd6

जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ केन्द्र पर्यावरण प्रकृती विभागाद्वारे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संत सावता नगरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

 

यावेळी विजय चौधरी यांच्या घरासमोर वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पर्यावरण प्रतिनिधी योगेश इंगळे राजेश नाईक, गौरव बडगुजर, राजेंद्र भावसार राजाभाऊ पाटील, विजय चौधरी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. येत्या काळात वृक्षारोपण व रेनवॉटर हार्वेस्टिंग ही एक चळवळ उभी राहिली तरच निसर्गाच्या सान्नीध्यात आपणास राहता येईल, नाहीतर ५० डिग्रीच्यावर तापमान गेले तर जगणे अशक्य होईल. आपल्या जिल्ह्याचे तापमान नेहमीच वाढलेले असते म्हणून प्रत्येक नागरिकांने किमान एक झाड लावून ते जागविले आणि पावसाळ्यात छतावरचे पाणी जमिनीत मुरवले तर दुष्काळ कधीही येणार नाही. आता एकच लक्ष आहे, पर्यावरण संरक्षण व संवर्धन, असे मार्गदर्शन श्री स्वामी समर्थ केंद्राचे पर्यावरण प्रतिनिधी वसंत पाटील यांनी यावेळी केले.

Exit mobile version