Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आरोग्य महाशिबिर यशस्वितेसाठी मंगळग्रह मंदिरात नियोजन बैठक

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील मंगळग्रह सेवा संस्था व  रेड स्वस्तिक सोसायटी याच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय मंगळ ग्रह मंदिरात होणाऱ्या आरोग्य महाशिबिराचे  नियोजन करण्यासाठी  मंगळ ग्रह मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

आरोग्य  शिबिरासाठी येत्या ५ ते २० ऑक्टोबर २०२२ दरम्यान मंगळग्रह मंदिरात येऊन रुग्णांना नावनोंदणी करता येणार आहे. त्यानंतर येणाऱ्या रुग्णांना शिबिराचा लाभ मिळणार नाही. बैठकीच्या प्रारंभी  प्रांताधिकारी सीमा अहिरे,  उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव, रेड स्वस्तिक सोसायटीचे सहमहाव्यवस्थापक रोशन मराठे, राज्य समन्वयक जे. बी. पाटील, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. कुणाल चौधरी, तालुका समन्वयक महेश पाटील, औरंगाबाद येथील संजय चव्हाण, मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे यांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल, लायन्स क्लबचे अध्यक्ष व खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक योगेश मुंदडा, डॉ. अक्षय कुलकर्णी. डॉ. नरेंद्र सोनवणे, सुंदरपट्टीचे  सरपंच सुरेश पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

डिगंबर महाले यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे (रोटवड), पालिकेचे प्रशासन अधिकारी संजय चौधरी, उदय खैरनार, प्रा.सुभाष पाटील, आनंद महाले, डी. ए. सोनवणे , सुनीता कुलकर्णी, उज्वला शाह, प्रशांत सिंघवी, विनोद अग्रवाल, विनोद कदम,डॉ.विशाल बडगुजर, डॉ.शरद बाविस्कर, डॉ.मिलिंद नवसारिकर, डॉ.विजय पवार, प्रितपालसिंघ बग्गा ,अमोल पाटील, आर. जे. पाटील, राहुल पाटील, जी. एस. चौधरी, एम. जी. पाटील, व्ही. व्ही. भदाणे, आर. टी. पाटील, व्ही. व्ही. कुलकर्णी, आशिष चौधरी, पुषंद ढाके आदिंसह अनेक मान्यवर  उपस्थित होते.

 

Exit mobile version