Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बुऱ्हाणपुर-अंकलेश्वर महामार्गावरील खड्डे दोन दिवसात बुजविण्यात येणार; बांधकाम विभागाचे आश्वासन

सावदा ता. रावेर प्रतिनिधी । सावदा आणि रावेर दरम्यानच्या बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील मोठ्या खड्ड्यांवरून भाजपा पदाधिकाऱ्यांनी आज सावदा येथे सार्वजनिक बांधकाम कार्यालय, विभागाचे कार्यकारी अभियंता शेख यांना चांगलेच धारेवर धरले. येत्या दोन दिवसात खड्डे बुजविण्याची व्यवस्था करते, असे मुख्य कार्यकारी अभियंता गिरासे यांनी सांगितले.

अनेक दिवसांपासून सावदा रावेर दरम्यान रस्त्यावर खूप मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्यांमुळे आजपर्यंत अनेक छोटे मोठे अपघात घडत असतात. यामधे अनेकांनी आपला जीव गमावलेला आहे. नुकतेच दोन दिवसापूर्वी मस्कावद सिम येथील महिलेचा आपल्या आईच्या अंत्यदर्शनासाठी जात असताना याच खड्डयांमुळे अपघात होऊन मृत्यू झाला. वारंवार तक्रार करून ही सार्वजनिक बांधकाम विभाग नाकर्तेपणामुळे नाहक लोकांचे जीव जात असून याचा जाब विचारण्यासाठी आज राहुल पाटील यांच्या नेतृत्वात सावदा येथे जाऊन शेख यांना जाब विचारण्यात आला व जळगाव येथील मुख्य कार्यकारी अभियंता गिरासे मॅडम यांचेशी राहुल पाटील यांनी यासंबधी तक्रार केली व लवकरात लवकर खड्डे बुजण्यात यावे व रस्ता दुरुस्ती करावा, अशी मागणी केली.

त्यावेळी गीरासे मॅडम यांनी येत्या दोन दिवसात खड्डे बुजण्याची व्यवस्था करतो, असे सांगितले आहे. यावेळी भाजपा पदाधिकारी राहुल पाटील, भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय माळी, वाघोदा सरपंच मुबारक तडवी, उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी, गोकुळ महाजन, विशाल पाटील ,बाळु काकडे, मुरलीधर महाजन, स्वप्नील पवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Exit mobile version