Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलेचा खून : पिंप्राळ्याच्या तलाठ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ( व्हिडीओ )

जळगाव, प्रतिनिधी । काल रात्री खून झालेल्या महिलेच्या गुन्ह्यात पिंप्राळ्यातील तलाठ्यासह तिची सासू व अन्य आप्तांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज मृत स्त्रीच्या माहेरच्या मंडळीने केली आहे. ही कारवाई होत नाही तोवर मृतदेह न स्वीकारण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील मयूर कॉलनीतील योगिता मुकेश सोनार या महिलेचा काल रात्री तिच्या दिराने कुर्‍हाडीचा वार करून खून केल्यानंतर आज या महिलेच्या आप्तांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. https://livetrends.news योगिता मुकेश सोनार (वय ३९, रा. मयूर कॉलनी) या आपली सासू आणि दिरासह राहतात. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे पती मुकेश सोनार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे ते आपल्या आठ वर्षाच्या मुलासह दीर आणि सासूसोबत वास्तव्याला होत्या. दरम्यान, मध्यंतरी घरात नेहमी किरकोळ कारणावरून वाद होत होते.

आज अशाच प्रकारचा वाद योगिता आणि त्यांचा दीर दीपक लोटन सोनार (वय ३८) यांच्यात झाला. यामुळे संतापलेल्या दीपकने आपल्या वहिनीच्या डोक्यात कुर्‍हाडीने घाव घातले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दीपकला रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, या अतिशय क्रूर कृत्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. https://livetrends.news आज सकाळी मृत योगिताच्या आई व बहिणीसह अन्य आप्तांनी जिल्हा रूग्णालयाच्या आवारात आक्रमक पवित्रा घेत इतरांवरही कारवाईची मागणी केली. त्या म्हणाल्या की, योगिता हिच्या पतीचे चार महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाल्यानंतर तिच्या सासरच्या मंडळीने तिला व मुलाला त्रास देण्यास सुरूवात केली. योगिताने दुसरा विवाह करून घ्यावा यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला. तसेच तिच्याकडे असणारे दहा ताळे सोने देखील गायब करण्यात आले.

योगिताच्या पतीच्या नावावर असणारे घर व अन्य मालमत्तेवर पिंप्राळ्याच्या तलाठ्याला हाताशी धरून सासू व दिराची नावे लावण्यात आली. यामुळे प्रॉपर्टी हडप करण्यासाठी योगिताचा खून करण्यात आला असून यासाठी पिंप्राळ्याचे तलाठी देखील जबाबदार असल्याने त्याला देखील यात आरोपी करावे अशी मागणी माहेरच्या मंडळीने केली. https://livetrends.news तर योगिताच्या हत्येप्रकरणी फक्त दिराला अटक करण्यात आली असली तरी यात पिंप्राळ्याचे तलाठी, तिची सासू, नणंद, नणंदोई आणि त्यांचा मुलगा या सर्वांचा हात असून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलीस प्रशासन ही मागणी मान्य करत नाही तोवर मयत योगिताचा मृतदेह न स्वीकारण्याचा पवित्रा देखील त्यांनी घेतला आहे.

दरम्यान, https://livetrends.news या प्रकरणी आता पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

खालील व्हिडीओत पहा मृत महिलेच्या माहेरच्या मंडळीने केलेली मागणी !

Exit mobile version