Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जॅग्वार विमानाचा अपघात टळला

अंबाला वृत्तसंस्था । अंबाला येथील वायूदलाच्या तळावर आज एका विमानाला पक्षाने धडक दिल्याने अपघाताचा धोका पायलटचा प्रसंगावधाने टळल्याची घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, अंबाला हवाई क्षेत्राच्या हद्दीत आज सकाळी वायूदलाच्या जॅग्वार विमानाला एका पक्षाने धडक दिली. यामुळे विमानाच्या काही भागाचे नुकसान झाले. काही क्षणांमध्येच हे विमान कोसळणार की काय ? अशी स्थिती निर्माण झाली. मात्र पायलटने प्रसंगावधान राखून हे विमान एका गावातील रहिवासी भागात सुरक्षितपणे उतारले. यात विमानाच्या पंखांचे थोड्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तथापि, हे विमान अपघातातून वाचले असून यावरील पायलटसह अन्य सहकार्‍यांनाही कोणतीही दुखापत झाली नाही.

Exit mobile version