Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना चित्रमय आदरांजली

पाचोरा प्रतिनिधी | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या कलेचा वापर करत अनेकजण आपापल्या पद्धतीने आदरांजली वाहत अभिवादन करत असतात. प्रथमेशने या विद्यार्थ्यानेही आपल्या कलेद्वारे चित्रमय आदरांजली अर्पण केली आहे.

पाचोरा येथील ‘रंगश्री आर्ट फाऊंडेशन ड्रॉईंग अँड पेंटिंग क्लासेस’चा विद्यार्थी प्रथमेश दिलीप सोनवणे याने महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी ‘पेन्सिल शेडिंग’च्या माध्यमातून चित्रमय आदरांजली अर्पण केली आहे.

याआधी त्याने गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, विठ्ठल, यांच्या प्रतिकृती जलरंगात तयार केल्या असून बाळद येथील शिक्षक दिलीप सोनवणे यांचा तो मुलगा आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या कलेचा वापर करत अनेकजण आपापल्या पद्धतीने आदरांजली वाहत अभिवादन करत असतात

Exit mobile version