Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहुर पोलिस स्थानकात पीआय सचिन सानप यांची नियुक्ती : इंगळेंना निरोप

पहुर. ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांची जालना येथे बदली झाली असून त्यांनी पदभार सोडला असून त्यांच्या जागी छत्रपती संभाजी नगर येथून सचिन सानप यांची नियुक्ती झाली आहे.

येथील पोलीस स्थानकात प्रतापराव इंगळे यांना निरोप देण्यात आला. तर त्यांच्या जागी बदलून आलेले सचिन सानप यांचे स्वागत करण्यात आले. सचिन सानप यांची २००६मध्ये पोलिस दलात सहा. पोलिस निरीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर अहमदनगर शहर, श्रीगोंदा,सोनई तसेच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, पारोळा, वरणगाव येथे सेवा बजावली आहे.

पोलिस निरीक्षक म्हणून बढती मिळाल्यानंतर छत्रपती संभाजी नगर येथील बेगमपूरा, वेंदातनगर आदी पोलिस स्टेशन ला सेवा बजावली असून पोलिस निरीक्षक म्हणून बढती मिळाल्या नंतर जळगाव जिल्ह्यात पहुर पोलिस स्टेशन ला प्रथमच नियुक्ती झाली आहे. पहूर पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्याविरूध्द वॉंश आऊट मोहीम राबविण्यात आपले प्राधान्य राहील असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.

Exit mobile version