Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फोटोग्राफरची दुचाकी लांबविली

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द गावातून एका फोटोग्राफर व्यवसायिकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी पहाटे  उघडकीला आली. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, विजय पंडित पाटील (वय-४१, रा. पिंप्री खुर्द ता. धरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून फोटोग्राफरचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. १९ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता विजय पाटील यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ डीएफ ४९८८) ही त्यांच्या घरासमोर पार्किंगला लावलेली होती. दरम्यान सोमवारी २१ ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार वाजता एक अज्ञात व्यक्ती दुचाकी घेऊन जात असताना गल्लीत राहणारा राहुल पाटील याला दिसला. त्याला पकडण्यासाठी जात असताना अज्ञात दुचाकी घेऊन पसार झाला होता. याप्रकरणी विजय पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात सोमवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मोती पवार करीत आहे.

 

Exit mobile version