Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पीएफची रक्कम शेअर बाजारातही गुंतवणे शक्य

च‍ि

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सदस्यांना अधिकाधिक परतावा मिळावा, या हेतूने भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा झालेली रक्कम एलपीएसच्या (नॅशनल पेमेंट स्कीम) माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणे शक्य होणार आहे. कामगार मंत्रालयातर्फे या प्रस्तावाच्या विचार करणे सूरु आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सदस्यांना अधिकाधिक परतावा मिळावा या हेतूने ही सुविधा देण्यात येणार आहे. यानुसार संबंधित कर्मचाऱ्याने एनपीएसचा पर्याय निवडल्यास एक महिन्याच्या कालावधीत पीएफमधील सर्व जमा रक्कम ही एनपीएसमध्ये हस्तांतरित केली जाईल. त्यानंतर ही रक्कम शेअर बाजारात गुंतवता येईल. विशेष म्हणजे, यातून पुन्हा माघारी परतण्याचा निर्णयही कर्मचाऱ्यास घेता येईल. म्हणजेच, एनपीएसमधून पुन्हा ईपीएफमध्ये परतण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांसाठी खुला असेल. मात्र ही सुविधा घेणाऱ्या कर्मचाऱ्यास ईपीएफमध्ये नवा सदस्य मानले जाईल. ‘नोकरीच्या सुरुवातीला या प्रस्तावातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही कर्मचाऱ्यास नव्या नोकरीत रुजू होतानाच ईपीएफ व एनपीएस यातील एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. सद्यस्थितीत कर्मचाऱ्यांना केवळ ईपीएफओच्या अंतर्गत सदस्यत्व मिळते.

Exit mobile version