Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अब की बार १०० पार ! ; पेट्रोलने गाठली शंभरी

जळगाव प्रतिनिधी । सातत्याने भाव वाढत असलेल्या पेट्रोलने अखेर जळगावात शंभरी गाठली असून जिल्ह्यात पहिल्यांदा इतके विक्रमी मूल्य मोजावे लागत आहे.

जळगाव शहरात पेट्रोलचे दर रविवारी शंभरीपार झाले. पेट्रोलचे एका लीटरचे दर १०० रुपये चार पैसे झाले आहेत. मध्यंतरी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याचा वेग कमी झाला होता. याला पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका कारणीभूत असल्याचे मानले जात होते. या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर दरवाढ अटळ असल्याची चर्चा होती. आता झालेही तसेच यामुळे आता जळगाव शहरात पेट्रोलचे मूल्य शंभर रूपयांच्या पार गेले आहे.

लॉकडाऊनमुळे लोक आधीच समस्येने ग्रासलेले आहेत. बर्‍याच जणांचा आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत कमी झालेला असतांनाच आता पेट्रोल वाढीमुळे लोकांना फटका पडणार असल्याने याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आणि वाढलेल्या किंमती कमी होत नसल्याचा आधीचा अनुभव असल्यामुळे आता जळगावकरांना पेट्रोलसाठी शंभर रूपयेच मोजावे लागणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version