विवाहितेचा ५० हजारासाठी छळ; चार जणांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । पतीला पाच ग्रॅमची अंगठी आणि दीराला प्लॅट घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह चार जणांवर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील वाल्मिक नगरातील माहेर असलेल्या  ज्योती राहूल डावरे यांचा विवाह नाशिक येथील राहुल बापु डावरे यांच्याशी २५ जुन २०२० रोजी रितीरिवाजानुसार झाले. लग्नाच्या काही दिवसांपासूनच घरात विवाहितेला टोमणे मारणे सुरू झाले. लग्नात मानपान दिला नाही, तसेच पती राहूल याला ५ ग्रॅमची अंगठी घेतली नाही. यासाठी पती राहूल डावरे दारू पिऊन विवाहिेतेला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. दरम्यान, विवाहितेच्या आईवडीलांनी सर्व ठिक होईल म्हणून सांगितले. त्यानंतर सासू लता बापू डावरे, दिर विक्रम बापु डावरे, नणंद नेहा बापू डावरे सर्व रा. पंचवटी नाशिक यांनी देखील टोमणे मारणे सुरू केले. पती राहूल साठी ५ ग्रॅमची अंगठी आणि दीर विक्रम डावरे याला मुंबई प्लॅट घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रूपये आणावे यासाठी छळ सुरू केला. याला कंटाळून विवाहिता २५ सप्टेंबर २०२० रोजी माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र पाटील करीत आहे. 

Protected Content