Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शरदचंद्रीका पाटील बी. फ़ार्मेसी महाविद्यालयाला विनाअनुदानित डी फार्मसीची परवानगी

चोपडा – महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा संचलीत श्रीमती शरदचंद्रीका सुरेश पाटील बी. फ़ार्मेसी महाविद्यालयाला विनाअनुदानित डी फार्मसी महाविद्यालयाची परवानगी प्राप्त झाली आहे.

येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालीत बी.फार्म औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय हे 1992 साली चालू झालेले आहे. महाविद्यालयामध्ये बी फार्मसी, एम फार्मसी तसेच पीएचडी चा अभ्यासक्रम पूर्ण क्षमतेने PCI व AICTE न्यू दिल्ली यांच्या परवानगीने कवियेत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत कार्यरत आहे. तसेच महात्मा गांधी शिक्षण मंडळ यांचे अनुदानित तत्वावर महाराष्ट्र शासनाचा 60 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे डी फार्मसी महाविद्यालय कार्यरत आहे. औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय चोपडा यांनी नवीन विनाअनुदानित तत्वावर डी फार्मसी साठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया न्यू दिल्ली (PCI)यांच्याकडे अर्ज सादर केलेला होता. त्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्च महिन्यात फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया न्यू दिल्ली यांच्या मार्फत महाविद्यालयाचं इन्स्पेक्शन करण्यात आलेले होते. महाविद्यालयात उच्च दर्जाचं क्लासरूम व उत्तम प्रतीचे प्रयोगशाळा(लॅब), तशेच प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लायब्ररी आणि सोबत अनुभवी व उच्च शिक्षित पूर्ण क्षमतेने असलेला शिक्षक वर्ग. या सगळ्या बाबींचा विचार करता फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (PCI) न्यू दिल्ली यांनी सन 2020-21 करिता 60 विद्यार्थी प्रवेश समतेची परवानगी या महाविद्यालयाला देण्यात आलेली आहे. दुसरे असे की ज्या विद्यार्थ्यांना डी फार्मसी साठी आपला प्रवेश निश्चित करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज 25 ऑगस्ट पर्यंत भरणे गरजेचे आहे. अद्यापही ज्या विद्यार्थीनी फॉर्म भरला नसेल त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घेण्याचे आव्हान श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय, चोपडा येथील प्राचार्य डॉ.गौतम प्रकाश वडनेरे यांनी केले आहे.

तसेच ज्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासंदर्भात अडचणी येतात अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने विनामुल्य फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आव्हान देखील महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आलेले आहे. नवीन डी फार्मसीच्या अभ्यासक्रमा साठी संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले.

Exit mobile version