Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोलाणी मार्केटमधील अस्वच्छतेचा कायमचा तोडगा काढा; आयुक्तांना निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात नागरीकांचे स्वच्छता गृहात अस्वच्छता असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे दुकानदारांसह नागरीकांचे मोठे हात होत असून अस्वच्छेताचा कायमचा तोडगा काढण्यात यावा या मागणीचे निवेदन महिला संघटनेच्या वतीने सोमवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना देण्यात आले.

जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात गोलाणी मार्केट हे मोबाईल व असेसरीज विक्रीसाठी प्रसिध्द आहे. दिवसभर ग्राहक व नागरीकांची मोठी वर्दळ असते. अश्याातच गोलाणी मार्केट परिसरात नागरीकांसाठी स्वच्छतागृहाची सोय नसल्याचे मोठे हाल होत आहे. मार्केटमधील स्वच्छतागृहात मोठ्या प्रमाणावर घाण असल्याने सर्वत्र दुर्गधी पसरली आहे.  शिवाय या मार्केटमध्ये भाजीपाला विक्रेत्या महिला आणि दुकानात काम करणाऱ्या महिला देखील असल्याने स्वच्छतागृह नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे.  या ठिकाणी स्वच्छतेची कायमस्वरूपी व्यवस्था नसल्यामुळे आणि स्वच्छतागृह नसल्यामुळे त्या महिलांना रोगराईला सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, येथील स्वच्छतागृहे नियमित साफसाफाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन महिला संघटनेच्या वतीने महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना देण्यात आले. याप्रसंगी महिला संघटनेच्या राजश्री शर्मा, सुनीता चौधरी, रेखा कुलकर्णी,  छाया सारस्वत, सुधा काबरा आदी उपस्थित होत्या.

Exit mobile version