Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्थायी समिती सभापतींची कार्य तत्परता !

WhatsApp Image 2019 11 22 at 16.56.07

जळगाव, प्रतिनिधी | मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदाचा पदभार स्विकारलेल्या सभापती अॅड.शुचिता हाडा यांनी आपली कार्यतत्परता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. आज झालेल्या स्थायी सभेनंतर त्यांनी सभेत मंजूर ठराव दोन तासात नगरसचिवांकडे सुपूर्द केले.

आज शुक्रवारी पार पडलेल्या दुसर्‍या स्थायी समितीच्या सभेत ५ विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सभेत मंजूर झालेले सर्व ठराव स्थायी समिती सभापती अॅड. शुचिता अतुलसिंह हाडा यांनी  २४ तासाच्या आत ठराव देण्याचे आधीच जाहीर आहे. त्यानुसार आज सभेनंतर  २ तासात नगरसचिवांच्या स्वाधीन केले. यावेळी स्थायी समिती सदस्य रेश्मा काळे उपस्थित होते.

Exit mobile version