Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिव्यांग बांधवांना साहित्यामुळे आत्मनिर्भरने जीवन जगता येईल- खा. रक्षा खडसे

रावेर  -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी कार्य करीत आहे. समाजात उपेक्षित घटक असलेल्या दिव्यांग बांधवांच्या जिवनात प्रकाश आणण्यासाठी कार्य मोदींनी केली आहे.त्या़ंच्यामुळे दिव्यांग बांधवांना मिळालेल्या या साहित्या सहाय्याने आत्मनिर्भर जिवन जगता येईल, असे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे यांनी रावेर येथे बोलताना केले.

खासदार श्रीमती खडसे यांच्या महत्वकांक्षी असलेली दिव्यांग बांधवांना निःशुल्क साहायक उपकरण वितरण करण्यात आले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार सजंय सावकारे, आमदार शिरीष चौधरी,  भाजपा रावेर लोकसभा  जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, रावेर लोकसभा जिल्हा निवडणूक प्रभारी नंदकिशोर महाजन, प्रांतधिकारी कैलास कडलग, तहसिलदार बंडू कापसे, भाजपा जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, अशोक कांडेलकर, भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, रावेर लोकसभा संयोजक सुनिल पाटील, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुलकर, शहराध्यक्ष दिलीप पाटील, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, सि एस पाटील, पि के महाजन यांच्यासह मोठ्यासंख्येने भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मतदारसंघातुन आलेल्या दिव्यांग बांधवांना यावेळी विविध साहायक उपकरण वितरीत करण्यात आले.

Exit mobile version