Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव येथे हॉस्पिटल वेस्ट कचरा कुंडीत टाकणाऱ्या डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई

WhatsApp Image 2019 10 03 at 4.12.12 PM

जळगाव, प्रतिनिधी | रिंगरोड येथील लोकमान्य हाऊसिंग सोसायटी परिसरातील पंडित हॉस्पिटलमधील वेस्ट मटेरियल कचरा कुंडीत टाकल्याने हॉस्पिटलवर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पंडित हॉस्पिटलमधील सलाइन बाटल्या, सलाइन नळया तसेच कापूस व बॉयोवेस्ट मटेरियल जेडीसीसी बँक जवळील कचरा कुंडित दवाखान्यातील कर्मचारी टाकत होते.  यावेळी आरोग्य सफाई कामगार यांनी ते बघितले व तेथील आरोग्य निरीक्षक सूरज तामबोइ यांना माहीती कळवली. तसेच घटनास्थळी आरोग्य पर्यवेक्षक अशोक नेमाडे हजर झाले. तक्रारीनुसार प्रत्यक्ष पाहणी करुन दंडात्मक कारवाई करण्यात आली. बॉयोवेस्ट मटेरियल उघड़यावर कचरा कुंडित टाकणाऱ्या डॉ. मंदार पंडित (पंडित हास्पिटल) रिंगरोड यांना मनपा आरोग्य विभागा कडून ५००० रुपये दंड आकारण्यात आला आहे. यावेळी नागरिकांनी परिसरात कारवाई पाहण्यासाठी गर्दी केली होती.

Exit mobile version