Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कारच्या धडकेत पादचारी जखमी; शनीपेठ पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । रस्त्याचे पायी जाणाऱ्या मजूराला मागून भारधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक देवून जखमी केल्याची घटना शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकात ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात कारचालकविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, आसीफ शेख अब्दुल रहेमान (वय-४४) रा. संतोषी माता नगर, मेहरूण हे बांधकाम सेंटींगचे काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता कामावरून मेहरूण येथे पायी जात असतांना पुष्पलता बेंडाळे चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरो (एमएच १९ सीझेड ७०७०) ने आसीफ शेख यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. यात त्यांच्या कमरेला अधिक दुखापत झाली. आसीफ शेख यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत देशमुख करीत आहे. 

 

Exit mobile version