Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शांततेने पार पाडा शोभायात्रा : यावल येथे शांतता समितीची बैठक

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येत्या २२ जानेवारी रोजी संपुर्ण देशासह यावल शहरात व परिसरात साजरा होणारा श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्व जातीधर्माच्या लोकांनी कुठल्याही प्रकारच्या सोशल मिडीया व धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या अफवांवर विश्वास न ठेवता एकत्र येवुन साजरा करावा असे आवाहन पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी येथील शांतता समितीच्या बैठकीत केले.

यावल पोलीस ठाण्याच्या आवारात सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी श्रीराम मंदीर प्राणप्रतिष्ठाच्या निमित्ताने शहरात काढण्यात येणार्‍या शोभायात्राच्या पार्श्वभुमीवर पोलीस स्थानकाच्या आवारात शांतता समितीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी समिती सदस्य हाजी शब्बीर खान यांनी आपल्या शहराची एकता अखंडता बंधुभाव कायम राखुन शोभायात्रा संपन्न करावी. तसेच त्यांनी लहान अल्पवयीन मुलांमध्ये ज्या पद्धती जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाज विघंसंतोषी मंडळी कडुन करण्यात येत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत असुन,यासाठी आपण सर्वांनी एकत्र येवुन प्रयत्न करणे गरजे असल्याचे आवाहन केले.

तर पुंडलीक बारी व दिपक बेहेडे यांनी देखील याच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. पोलीस निरिक्षक राकेश मानेगावकर यांनी शोभायात्रेत दोन्ही समुदायाच्या लोकांनी सलोखा बाळगत कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन केले.

या बैठकीला शांतता समितीचे जेष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान,गोपाळसिंग पाटील, विजय सराफ ,माजी नगरसेवक गुलाम रसुल,भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, यावल शहराध्यक्ष निलेश गडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चेतन अढळकर, हाजी गप्फार शाह, हाजी ईकबाल खान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सैय्यद युनुस सैय्यद युसुफ, प्रमोद नेमाडे, माजी नगरसेवक असलम शेख नबी, दिपक बेहेडे, पुंडलीक बारी, मोहसीन खान, सेवानिवृत्त प्रार्चाय शायर रहीम रजा, हबीब मंजर, शिवसेना (उबाठा )चे पप्पु जोशी यांच्यासह आदी शांतता समिती सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version