रावेरात शांतता कमेटीची बैठक

रावेर प्रतिनिधी । रमजानचा पवित्र महिना आणि कोरोनाचे निर्बंध निमित्त रावेरात शांतता कमेटीची बैठक घेण्यात आली. 

यात रमजान महिन्यात होणाऱ्या इप्तार पार्टीवर कडक निर्बंध आहे.रावेर शहरात शांतता टिकुन राहावी म्हणून हिंदू-मुस्लिम समाजातील प्रतीष्ठित नागरीकांनी प्रर्यत्न करण्याची गरज असल्याचे मत पोलिस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी रावेरात व्यक्त केली.

दरम्यान आयोजित शांतता कमीटीच्या बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी,उप विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, नगराध्यक्ष दारा मोहोम्मद, पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन शिवसेना जिल्हा उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन, नगर सेवक आसिफ मेंबर,सा.पो. नि शितल कुमार नाईक असदुल्लाह खान, भाजपा शहराध्यक्ष दिलीप पाटील राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, सादिक मेंबर गयास महाजन,कौसर शेख,सैय्यद आरीफ आदींची बैठकीला उपस्थिती होती.

आक्षेपार्ह पोस्टर प्रकरणी गुन्हा दाखल – डॉ. मुंढे

रावेर शहरात काहींनी रस्त्यावर आक्षेपार्ह पोस्टर चिटकवले होते.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.तरुणाना खास अवाहन आहे. कोरोनामुळे काळ अतिशय वाईट सुरु आहे.उगाच कायदा-सुव्यस्था हातात घेऊ नका रावेरात शांतता राखा दोन समाजात तेढ निर्माण होईल असे काहीही करू नका काल सकाळी झालेल्या घटना संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी दिली.

 

Protected Content