Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राहुल गांधी यांना समजून घेण्यात पवार कमी पडले – थोरात

balasaheb thorat

मुंबई – शरद पवार हे ज्येष्ठ नेते असले तरी ते राहूल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडल्याचे प्रतिपादन आज महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. या माध्यमातून त्यांनी यशोमती ठाकूर यांची जोरदार पाठराखण केल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर शरद पवार यांनी भाष्य केलं होतं. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी नाव न घेता राहुल गांधी यांच्यात सातत्य नसल्याचं मत व्यक्त केलं होतं.  त्यावर “सरकार स्थिर राहावं असे वाटत असेल तर काँग्रेस नेतृत्त्वावर बोलणं टाळावं,” असं ट्वीट काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि राज्याच्या महिला-बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. त्यानंतर आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही आपली नाराजी बोलून दाखवली.

राहुल गांधी यांना पक्षात स्वीकारार्हता असून ते आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेस पुन्हा संघटित होत आहे. राहुल गांधी यांनी जीवनात जे दुख पाहिले, त्यांच्यावर जे आघात झाले त्यातूनही उभे राहून ते नेतृत्व करत आहेत. पुढील काळातही ते समर्थपणे नेतृत्व करणार आहेत. ते करत असलेल्या कामाच्या विरोधात भाजपच्या प्रचार यंत्रणा काम करतात, त्याचा परिणाम असतो. राहुल गांधी पुढची वाटचाल यशस्वी करणार आहेत, त्यावर आमचा विश्वास आहे. शरद पवारांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो. मात्र, ते राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले असं वाटतं. काँग्रेसजणांना जे वाटले ते त्या बोलल्या आहेत. आमच्या काँग्रेस जणांचे मत यशोमती ठाकूर यांनी मांडले आहे, प्रतिपादन बाळासाहेब थोरात यांनी केले. या माध्यमातून त्यांनी यशोमती ठाकूर यांची जोरदार पाठराखण केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version