Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पवार व ठाकरे यांच्यात तातडीची बैठक

मुंबई प्रतिनिधी । देवेंद्र फडणवीस व संजय राऊत यांच्यातील भेटीनंतर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात तातडीची बैठक झाली आहे.

काल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची ग्रँड हयात हॉटेलमध्ये सुमारे दोन तास भेट झाली, या भेटीची माहिती सुरुवातीला लपवण्यात आली, परंतु माध्यमांनी याबाबत वृत्त दाखवल्यानंतर संजय राऊत आणि भाजपानेही ही भेट झाल्याचं कबूल केले, परंतु या भेटीमुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

या संपूर्ण घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसही अलर्ट झाली आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी पोहचले आहेत, या दोघांमध्ये राज्यातील प्रश्‍न आणि सध्या सुरु असणारी परिस्थिती यावर चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Exit mobile version