Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज ठाकरेंकडून पवार आणि त्यांच्या ईडी चौकशीच्या कारणाचा गौप्यस्फोट

0Sharad 26 Raj 4

 

मुंबई (वृत्तसंस्था) माझी आणि पवार कटुंबियांमागे ईडी चौकशी लावण्यामागे निवडणुकीत आपल्याला कुणी आर्थिक मदत करू नये हा उद्देश आहे. ईडीची चौकशी किंवा अन्य प्रकरणात चौकशा मागे लागल्यास उद्योगपती, देणगीदार त्यापक्षाशी संपर्क टाळतात. फोनही घेत नाहीत. त्यामुळे पक्षाला आर्थिक मदत मिळत नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

 

राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्याच्या विधानसभा निवडणुका लढवणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यादरम्यान राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे यांची कोहिनूर मिल खरेदीप्रकरणात ईडी चौकशी झाली. तर शरद पवार यांचे नाव राज्य सहकारी बँक घोटाळ्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ईडी चौकशी लावण्यामागे आम्हाला आर्थिक मदत मिळू नये, असा सरकारचा प्रयत्न असल्याचा खळबळजनक असा आरोप राज यांनी लावला आहे.

Exit mobile version