Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाटील द्वयीने घेतली एकनाथराव खडसे यांची भेट

मुंबई प्रतिनिधी | पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि आ. चिमणराव पाटील यांनी आज मुंबईत एकनाथराव खडसे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

याबाबत वृत्त असे की, मध्यंतरी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची प्रकृती बिघडल्याने ते बॉंबे हॉस्पीटलमध्ये उपचार घेत होते. त्यांना अलीकडेच डिस्चार्ज मिळाला आहे. कालच माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी नाथाभाऊंची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. याप्रसंगी जिल्हा बँक निवडणुकीबाबतही चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

यानंतर आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांनी नाथाभाऊंची भेट घेतली. यात त्यांनी प्रकृतीची चौकशी करून त्यांना लवकरच स्वास्थ लाभो ही सदिच्छा व्यक्त केली. दरम्यान, या भेटीत जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीबाबत देखील चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र याचा तपशील समोर आलेला नाही.

 

Exit mobile version