Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे निशुल्क नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिरास रुग्णांचा प्रतिसाद

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील कोळवद येथे डॉ.कुंदन फेगडे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित ‘निशुल्क नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिर’ संपन्न झाले. त्यास रुग्णांचा प्रतिसाद चांगला प्रतिसाद लाभला.

या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी, योग्य सल्ला व मार्गदर्शन करून डोळ्यात मोतीबिंदू आढळल्यास रुग्णांना मोतीबिंदू शास्त्रक्रियेची तारीख देऊन रुग्णाची अनुभवी तज्ञांमार्फत शस्त्रक्रिया करण्यात आली.

यावेळी डॉ.कुंदन फेगडे मित्र परिवार व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या वतीने रुग्णांची जाण्या येण्याची, राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली. या शिबिरात एकूण १७६ नेत्र रुग्णांची तपासणी व २० रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठविण्यात आले.

शिबिरात कांताई नेत्रालय, जळगाव येथील शिबीर नियोजक युवराज देसर्डां यांनी मार्गदर्शन केले. नेत्र चिकित्सक जॅकी शेख यांनी रुग्णांची तपासणी केली. या वेळी जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती हर्षल पाटील व सामाजिक कार्यकर्ते, डॉ कुंदन फेगडे यांनी रुग्णांना आपल्या मार्गदर्शनातून शिबीरासंदर्भात माहीती दिली.

या प्रसंगी हर्षल पाटील यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आले. या वेळी डॉ.कुंदन फेगडे, कोळवदचे सरपंच याकूब तडवी, कोळवदचे उपसरपंच शशिकांत चौधरी, सातोदचे उपसरपंच ललित पाटील, माजी सरपंच पांडुरंग पाटील, अनिल पाटील, प्रल्हाद चौधरी, युवराज देसालडे, मीनाक्षीताई भिरूड, भगवान पाटील, पद्माकर महाजन, आशिष मोरे, सचिन फेगडे भगवान बर्डे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला हेमंत पाटील परेश फेगडे, सागर लोहार, तुषार चौधरी, मनोज बारी, विशाल बारी, हर्षल सोनवणे, तीर्थराज भिरूड, अक्षय पाटील आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले

Exit mobile version