Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात पोलीस दलाचे पथ संचलन

रावेर प्रतिनिधी । बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रावेर पोलीस दलातर्फे संवेदनशिल भागात उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागातून रूटमार्च काढण्यात आला.

आगामी काळात विविध सण साजरे करण्यात येत आहे. तसेच बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पंचशील चौक, कुरेशी मोहल्ला, इमाम वाडा, राजे संभाजी नगर, बंडु चौक, खाटीक वाडा, नागझिरी चौक, लेंडी पुरा, महात्मा फुले चौक, स्वामी विवेकानंद चौक, राजे शिवाजी चौक, कारागीर नगर, मुस्कान पान सेंटर, भोई वाडा, गांधी चौकमार्गे पोलीस स्टेशन मार्गाने रूटमार्च घेण्यात आला. यावेळी रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड, आरसीपी प्लाटुन व एसआरपीएफ प्लाटून यांनी सहभाग नोंदविला होता.

Exit mobile version