Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मार्च पूर्वीच्या वाहनांवर पासिंग फी वाढ करू नये – मोटार चालक-मालक युनियनचे निवेदन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  मार्च २०२२ पूर्वीच्या वाहनांवर CFRA पासिंग फी वाढ करू नये अशा मागणीचे निवेदन जळगाव जिल्हा मोटार चालक- मालक युनियनच्यावतीने गणपती नगरातील उपप्रादेशीक कार्यालयात उपप्रदेशीक अधिकारी श्याम लोही यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आरटीओ विभागाने १ एप्रिल २०२२ पासून १५ वर्षे झालेले मोटार वाहन सीएफआरए पासिंग फी ही जड वाहनांसाठी १२ हजार ५०० व हलके वाहनांना ७ हजार ५०० तर प्रवासी वाहनानां  १० हजार अशी भरमसाठ फी वाढ करण्यात आलेली आहे. परंतु ज्या मोटार वाहन मालकांनी मार्चमध्ये किंवा त्यापूर्वी शासकीय पासिंग फी भरलेली आहे, अशा वाहन मालकांची गाडी पासिंग करून मिळावी.

दरम्यान, वाहन तपासणी करता पुढील तारीख मिळते परंतु गाडीसाठी आपल्या कार्यालयातील तपासणीसाठी नेमलेले अधिकारी हे सांगतात की, नवीन दंड व फी भरावी लागेल, तरी ३१ मार्च रोजी पूर्वी फी भरलेली आहे अशा वाहनांना नवीन फी भरण्याची गरज नाही. ज्यांनी १ एप्रिल २०२२ नंतर CFRA साठी फी भरलेली आहे अश्या वाहनधारकांना नवीन दर नियमाप्रमाणे लागू करावे, अशी मागणीचे निवेदन जळगाव जिल्हा मोटार चालक-मालक प्रतिनिधी युनियनच्या वतीने बुधवारी १३ एप्रिल रोजी दुपारी उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी श्‍याम लोही यांना देण्यात आले.

याप्रसंगी युनियन संघटनेचे अध्यक्ष रज्जाक खान गणी खान, उपाध्यक्ष सरसण वासूपाणी, सचिव सुरेश पाटील, सय्यद आसिफ, गणेश राणे, दीपक नेटके, भावेश मोमया, दीपक जैन, मनोहर खर्चे, रामा शिरसाट, अल्ताफ अहमद हाफिस खान, अनिस खान यांच्यासह आदी उपस्थित होते.

Exit mobile version