Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजकीय घड़ामोडींनी पक्ष चार्ज होणार नाही : गिरीश महाजन

girish mahajan and ajit pawar

मुंबई (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून सुरु असणारे राजकीय नाट्य पाहता या राजकीय घड़ामोडींनी पक्ष  चार्ज होणार नाही, अशा शब्दांत ना.महाजन यांनी पवारांना टोला लगावला. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायला हवा, असे म्हणत त्यांनी पवारांवर टीका केली आहे.

 

अजित पवार यांनी राजीनामा देण्याचे कारण आज पत्रकार परिषद घेत स्पष्ट केल्यानंतर राजकीय वर्तुळातून बऱ्याच प्रतिक्रिया समोर आल्या. ज्यामध्ये भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवार यांना थेट शब्दांत टोला लगावत राजकीय घड़ामोडींनी पक्ष चार्च होणार नाही, असे म्हटले आहे. शनिवारी सायंकाळी अजित पवार यांनी विधीमंडळात जाऊन त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. ज्यानंतर जवळपास २० तासांनी, बऱ्याच राजकीय घडामोडींना तोंड फुटल्यानंतर अजित पवार माध्यमांसमोर आज दुपारी आले होते.

Exit mobile version