Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथील बाल सुसंस्कार शिबिरात ६५ विद्यार्थ्यांचा सहभाग

06d78295 75e7 48c8 9dd7 ca2b905b40b0

पाचोरा(प्रतिनिधी) चैत्र व.०१, दि. २०/४/२०१९ ते वैशाख शु.०१, दि.४/५/२०१९ दरम्यान येथील लक्ष्मी पार्कमधील लक्ष्मी माता मंदिरासमोर भव्य वारकरी बाल सुसंस्कार शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला. ह.भ.प. सुनिताताई देसले, ह.भ.प.महंत ज्ञानेश्वर माऊली गोशाळा संस्थापक सातगाव डोंगरी, यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.

 

या बाल सुसंस्कार शिबिरामधे अध्यात्मिक भग्वदगिता हानुमान चालिसा रामायण हरिपाठ ज्ञानेश्वरी अभंग पाठ व कलात्मक विषय टाळ मृदुंग तबला हार्मोनियम गायन विशेष करून वारकरी नृत्य पाऊली इत्यादी अध्यात्मिक उपक्रम राबविण्यात आले. या शिबिरात ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शिबिराचे मार्गदर्शक ‌म्हणून ह.भ.प. संजय महाराज पाचपोर देवाची आळंदी पुणे, ह.भ.प. गोविंद महाराज शिंदे आळंदी, निवृत्ती महाराज आळंदी, मनोहर महाराज आळंदी, किसन महाराज परभणी उपस्थित होते.

या शिबिरासाठी ह.भ.प. नानासो मधुकर रामदास महाजन, अप्पासो अशोक शिवलाल महाजन, ‌ह.भ.प. जगदीशजी शर्मा, डॉ. भुषण मगर, दगा देवराम पाटील, ह.भ.प. तुळशिराम कुमावत, ह.भ.प. श्रीराम विवेकानंद, नारायण खैरनार, मोहनसिंग राजपूत, श्री विठ्ठल मंदिर संस्थान पिंपळगाव हरेश्र्वर, भवानी स्टील ट्रेडर्स, ह.भ.प.राजेंद्र पाटील, प्रदीप पाटील बांबरुड, यांनी महत्त्वाचे योगदान दिले. या शिबिरातील विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जिल्हा अध्यक्ष शाहीर माऊली नानासो विठ्ठल एकनाथ महाजन यांनी केले व कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

Exit mobile version