Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दगडी दरवाजाचा भाग कोसळला ; ४ दिवसांचा अलटिमेंट

अमळनेर प्रतिनिधी ।  दगडी दरवाजाचा पुन्हा काही भाग कोसळला आहे. यापार्श्वभूमीवर दगडी दरवाजा पुनर्निर्माण समितीतर्फे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची भेट घेत निवेदनाव्दारे चर्चा करण्यात आली आहे. दरम्यान, येत्या ४ दिवसात काम वेगाने सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनावेळी देण्यात आला. 

पुरातत्व विभागाचा हेतु पुरस्कर दुर्लक्षामुळे (दि.24/07/2019) रोजी उजवा बाजूचा बुरुज कोसळला. त्या दिवसापासून ते आजतागायत जणू काही प्रशासन दगडी दरवाजा पडण्याची च वाट पाहत आहेत. अशी भावना जनमानसात निर्माण झाली आहे.अगस्ट 2020 पासून कार्यरंभ आदेशदेवून आजपर्यंत कामात कुठलीही विशेष प्रगती नाही. आज दि.02/09/2021 रोजी दगडी दरवाजा पुनर्निर्माण समितीने मुख्याधिकारी यांची भेट घेत काल दि 01/09/2021 रोजी रात्री 9 वाजता काही भाग पुन्हा कोसळल्याचा पार्श्वभूमीवर निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. काम तात्काळ वेगाने सुरू करावे अशी मागणी चे निवेदन देण्यात आले. संबंधित ठेकेदारास शक्य नसल्यामुळे काम संथगतीने सुरू आहे म्हणून ठेकेदार बदलवून काम तात्काळ सुरू करावे. अशी देखील मागणी करत येत्या 4 दिवसात जर काम वेगाने सुरू न झाल्यास तीव्र उग्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन समितीचा वतीने दिलेले आहेत.

निवेदनावर पंकज चौधरी,गोपी कासार, नाविद शेख, बाळासाहेब संदानशिव यांचा स्वाक्षरी आहेत. तात्काळ दखल घेऊन काम त्वरित सुरू होईल, असे आश्वासन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी समितीचा सदस्यांना दिले आहे.

Exit mobile version