Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

परशूराम जयंतीनिमित्त यावलमध्ये विविध कार्यक्रम

यावल प्रतिनिधी । येथील ब्राह्यण समाजाच्या वतीने भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सव निमिताने आयोजीत विविध कार्यक्रम मोठया उत्साहाच्या वातावरणात पार पडले.

यावल शहरातील ब्राह्यण समाजाच्यावतीने भगवान परशुराम यांची जयंती साजरी करण्यात आली. शहरातील प्रसिद्ध रेणुकामाताच्या मंदीरात भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पुजन वर्षा नरेश कुलकर्णी आणी प्रभाकर कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलेत. यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने भगवान परशुराम च्या प्रतिमेची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. बेहडे सुपर शॉपी पासुन भगवान परशुरामच्या प्रतिमेची भव्य शोभा यात्रा काढण्यात येवुन पंचवटी परीसरातील कोलेश्वर राम मंदीरात मिरवणुकीची सांगता करण्यात आली. या ठिकाणी गुणवंत विद्यार्थीनी भाग्यश्री कुलकर्णी व शिवानी कुलकर्णी यांचा समाजाच्या वतीने गौरव सत्कार करण्यात आले. या प्रसंगी समाज बांधवांच्या विविध समस्या व अडचणी वर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीचे प्रस्तावना दिपक पाटील यांनी केले तर शाम नाईक उपस्थित सर्व समाजाला मार्गदर्शन केले. उपस्थितांचे आभार पराग विजय सराफ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजबांधवांनी सहकार्य केले.

Exit mobile version