क्षुल्लक कारणावरून महिलेस मारहाण

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील टोळी येथे क्षुल्लक कारणावरून विवाहित महिलेस मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित महिलेने पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यात नमूद केले आहे की, त्या घरात स्वयंपाक करत असताना घराजवळ राहणारे भागवत भानुदास पाटील हे आरोळ्या मारत घरासमोरील खाटा फेकत होते. त्याचा जाब विचारल्याने भागवत पाटील यांनी पीडित महिलेला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच घरा लगतची भिंत पाडून अंगणातील महापुरूषाच्या पुतळ्याची विटंबना केली. याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून तपास उपविभागीय अधिकारी राकेश जाधव करत आहेत.

Protected Content