Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीची छेड काढून धमकावले : दोघांविरूध्द गुन्हा

पारोळा प्रतिनिधी | तालुक्यातील शिरसमणी येथील अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला धमकावल्याच्या प्रकरणी दोघांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात वृत्त असे की, शिरसमणी येथील १५ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. यानुसार गावातील सायबू उर्फ समाधान मागू पाटील व भावेश गोटू वंजारी हे पीडित तरुणीचा सतत पाठलाग करून छेड काढत होते. १० रोजी पीडित तरुणी पारोळा येथील शाळेतून घरी येत असताना संशयित सायबू याने तिला लग्नाची मागणी केली. तसेच लग्न न केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी संशयिताने पीडीतेला चाकूचा धाक दाखवला होता.

यामुळे घाबरलेल्या युवतीने घरात ठेवलेले कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी आईवडिलांनी तिला पारोळा येथे खासगी दवाखान्यात दाखल केले. चार दिवस उपचार घेतल्यानंतर १४ रोजी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांनी पीडीतेचा जबाब नोंदवला. त्यानंतर दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version