Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आंतरजातीय विवाहावरून तरूणीच्या आप्तांचा ‘रास्ता रोको’ !

पारोळा प्रतिनिधी | तालुक्यातील टोळी येथील युवकाने आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलीकडच्या मंडळीने पारोळा तालुका स्थानकात गुन्हा दाखल करण्यासाठी ‘रास्ता रोको’ आंदोलन केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा याबाबत वृत्त असे की, पारोळा तालुक्यातील टोळी येथील तरुण व चितोड (ता.धुळे) येथील तरुणीने नुकताच प्रेमविवाह केला आहे. यातील तरूणीच्या आप्तांसह सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी काल सायंकाळी पारोळा पोलीस स्थानकात तक्रार केली. या तरूणाने बळजबरीने विवाह लावला असून तरूणीला आमच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, पोलीस स्थानकात नवविवाहितांना बोलावून पोलिसांनी चर्चा केली. तर तरूणीच्या आप्तांनी महामार्गावर दोनदा रास्ता रोको आंदोलन करून वाहतून थांबवली. यामुळे पोलिसांनी लाठीमार करत त्यांना पांगविले. तर पोलिसांसमोर जबाब देतांना या तरूणीने आपण आपल्या पतीसोबतच राहणार असल्याचे सांगितल्याने अखेर तिच्या घरच्यांसह सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा नाईलाज झाला. मात्र या सर्व गदारोळात येथे काही काळ तणावाचे वातावरण पसरले. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version