तहसीलदारांना वाळू तस्करांची धक्काबुक्की; गुन्हा दाखल

पारोळा प्रतिनिधी | येथील तहसीलदार अनिल गवांदे यांना धक्काबुक्की करून त्यांच्या वाहनचालकास मारहाण करणार्‍या वाळू तस्करांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील तहसीलदार अनिल गवांदे हे बुधवारी मध्यरात्री क्र.एम.एच.१९-एम.०४९९ या शासकीय वाहनाने चालक कैलास भिवसन माळी यांच्या सोबत वाळू व गौणखनिज तस्करांचा शोध घेत होते. याप्रसंगी करंजी गावाच्या पुढे पेट्रोल पंपासमोर निळ्या रंगाचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर त्यांना आढळले. त्यात एक ब्रास वाळू भरलेली होती. त्यामुळे कारवाई करताना ट्रॅक्टर चालक (नाव माहीत नाही) व ट्रॅक्टर मालक बापू महाजन (पूर्ण नाव नाही, रा. उंदिरखेडा) यांनी शासकीय कामात अडथळा आणला. तसेच तहसीलदारांना धक्काबुक्की करत तहसीलदारांचे चालक कैलास माळी यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसे त्यांनी या दोघांना धमकावले.

महामार्ग क्रमांक सहावर शिवले नाल्याजवळ घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content